आई
आई
आई
आई या शब्दात
ब्रम्हांड सारे सामावले
कारण, पंचघटकाचने
जिव तिच्या उदरात घडले।
आई या शब्दात
सुख सारे सामावले
कारण, तिच्या मांडीवर
पळतात,चिंता कस्ट सारे।
आई या शब्दात
जिवनदान आहे सामावले।
कारण तिच्या पान्ह्याने
जिवास या वाढविले।
आई या शब्दात
विश्व सारे गुरफटले
कारण तिचे चित्त
असती सदैव पिलाकडे।
©®अस्मिता प्रशांत "पुष्पांजलि"
भंडारा