गार वारा
गार वारा
1 min
6.9K
गार वारा पावसाचा
हर्षलेल्या श्रावणाचा
वाळलेली बाग सारी
घाव हिरवा काळजाचा
आसमानी चंद्र आला
तोल गेला माणसाचा
ध्येय देण्या जीवनाला
मार्ग हा रे पावलाचा
दुष्मनीचा अर्ज आला
मित मी रे वादळाचा
वृत्त- मनोरमा
लगावली- गालगागा गालगागा