होळीचा सण
होळीचा सण
नाना रंगांची
करीत बघा उधळण
आला सण
होळीचा.
वसंताची चाहूल
देतसे फाल्गुन मास
पळसही खास
सजून.
वाईटाचे दहन
प्रतीक असे होळी
गोड पुरणपोळी
घरोघर.
करू नका
वृक्षांची तोड होळीपायी
पाणी अनाठायी
व्यर्थ.
सोडूनि द्यावे
अबोला ,राग, हेवा
जपावा ठेवा
अनमोल.