घेऊ स्त्रीला जरासे समजून
घेऊ स्त्रीला जरासे समजून
1 min
12.8K
स्त्रीत्वाचा तिच्या कधी
नका करू अपमान
असावा हो अभिमान
मनी मानसी आपुल्या ।।
वावर नानारुपात तिचा
म्हणून अर्थ आयुष्यात
विसरू नका हे सारे
असुद्या सदा ध्यानात !!
वर्षातुनी एकदा येतो
भावनांचा महापूर हा
शब्दांचे पतंग आकाशी
फसवे छान -सुंदर पहा।।
वेदना -दु:ख्ख मनातले
व्यथा घेऊ तिच्या समजून
संवाद साधून तिच्याशी
घेऊ स्त्रीला जरासे समजू !!