वाट पाहतो त्या दिसांची
वाट पाहतो त्या दिसांची
1 min
1.2K
शेतात दिनभर राबुनी,
कष्ट मनभर करुनी,
आकांक्षा या परीक्षेची,
वाट पाहतो त्या क्षणांची,
वाट पाहतो त्या दिसांची
राबतो दिसभर सारे,
रात्रीस दिसे चांदणे तारे,
चटणी भाकरी गोड लागूनी,
वाट पाहतो त्या पिकांची,
वाट पाहतो त्या दिसांची
दुष्काळी त्या नदी-तिरांची,
उपासमारी या गरिबांची,
हाव त्यास सावकारांची,
वाट पाहतो त्या उपकारांची
वाट पाहतो त्या दिसांची
अंगावरी लुगडा फाटका,
विचारांशी मिळे चटका,
भिती वाटे दारिद्री काट्यांची,
वाट पाहतो सुखी दिशांची,
वाट पाहतो त्या दिसांची