Become a PUBLISHED AUTHOR at just 1999/- INR!! Limited Period Offer
Become a PUBLISHED AUTHOR at just 1999/- INR!! Limited Period Offer

Nagesh Dhadve

Others

2  

Nagesh Dhadve

Others

थांब आता जरा!

थांब आता जरा!

1 min
1.4K


ना कळे त्यास रात
ना कळे त्यास दिस
दिसभर झटतो
प्रश्न पडे मला
तुज्यासाठीच ना ?

सुखासाठी दुःख झेलतो,
पोटासाठी भूक मारतो
दिवस झाले कमी
या तुझ्या आयुष्याचे !

जगायचे होते जेव्हा
कष्ट केलेस तू
मरायचे आहे आता तुला 
कधी जगशील तू ?

बघ जरा तुझ्याकडे
किती धावलास तू
तुझ्या शर्यतीत 
आयुष्य जिंकलो रे मी !

आता थांब की जरा
अजून किती करणार
आम्हाला जगवताना
स्वत:ला किती मारणार ?

अश्रू तुझे दिसूनसुद्धा
आम्ही आंधळे
पण तुझ्या सारखे दुःख 
नको कोणा,
हेच देवाशी मागणे

-नागेश(ndd)


Rate this content
Log in