धुंद मी
धुंद मी
1 min
252
रानफुल मी
फुले दरीखोऱ्यात
उभे तोऱ्यात
निराळा थाट
गंध माझा आगळा
*रंग वेगळा
पाहुनि मज
भुलला तो मिलिंद
प्रेमात धुंद
भ्रमर वेडा
करितो बहु दंगा
घालितो पिंगा
होती अखंड
त्याची प्रेमसाधना
स्पर्शिली मना
मीही भुललो
ऐकुनि आर्त साद
प्रेम संवाद