Become a PUBLISHED AUTHOR at just 1999/- INR!! Limited Period Offer
Become a PUBLISHED AUTHOR at just 1999/- INR!! Limited Period Offer

Prachi Deshpande

Inspirational

4.3  

Prachi Deshpande

Inspirational

प्रत्येकाचं मन एक वेगळं जग असतं

प्रत्येकाचं मन एक वेगळं जग असतं

1 min
315


जग बंदिस्त; पण मन स्वैर असतं!

आयुष्यभर त्याचं आकलन होत नसतं,

प्रत्येकाचं मन एक वेगळं जग असतं..!


अनुभवांच्या धाग्यादोऱ्यांनी काहीतरी विणून ठेवलं असतं,

आठवणींच्या खजिन्याला भेट द्यायला अधनं - मधनं कुणी येत असतं,

आयुष्याकडून आपण शिकलेले धडे नकळत कुणी दुसरंही गिरवत असतं,

प्रत्येकाचं मन एक वेगळं जग असतं..!


मोठी स्वप्नं कुठे उंच झोका घेत असतात,

आपली जवळची माणसं त्याला गती देत असतात,

स्वतःचा शोध घेत कुणी स्वतःला घडवत असतं,

प्रत्येकाचं मन एक वेगळं जग असतं...!


कुणाबद्दल द्वेष, स्वतःचा अहंकार!

कुणाचे आभार, काही जबाबदाऱ्यांचा भार!

हे गणित मनामनांत असतं,

प्रत्येकाचं मन एक वेगळं जग असतं..!


भितीने आभाळासारखं काळीज धडधडतं,

कोमल, प्रेमळ मनही कधीतरी कठोर बनतं!

मुद्दाम, कधी कळत नकळत, मन चढ उतारातून जात असतं...

प्रत्येकाचं मन एक वेगळं जग असतं..!


चुकलेल्या वाटांच्या पाऊलखुणा दिसतात 

अपूर्ण कार्ये मनात घर करून बसतात 

चुकांना स्वतःच्या माफ करीत मन मोठं होत असतं,

प्रत्येकाचं मन एक वेगळं जग असतं..!


जसे ऋतुचक्र जगाचे तसे मनाचे असते,

कधी शुभ्र प्रकाशवाट कधी वादळवाट असते

खंबीर त्यात करणारं प्रत्येकाचं श्रद्धास्थान असतं

प्रत्येकाचं मन एक वेगळं जग असतं...!


कुणाचं मन समजून घेणं कठीण असतं 

पण, समजून घेतलं तर मनात घर करता येतं!

शेवटी व्यक्तीचं सौंदर्य मनात असतं

प्रत्येकाचं मन एक वेगळं जग असतं..!


Rate this content
Log in