Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!
Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!

manasvi poyamkar

Romance Others

5.0  

manasvi poyamkar

Romance Others

होशील का माझी साजणी

होशील का माझी साजणी

1 min
1.4K


रंगबावरे स्वप्न माझे

तुही कधी बघशील का

अस्तित्व तुझे मृगजळ जणू

निदान स्वप्नात माझी होशील का?

गीत ओठी रमतात माझ्या

गोडवे ज्यात तुझ्या सौंदर्याचे

मृगनयनी हे कटाक्ष तुझे

कधी माझ्या नजरेतून झेलशील का?

तू हसता नाजूक गाली

खुलते माझिया हर्षाची कळी

हास्याचे हे अमृत बरसाऊनी

जीवनदान मज देशील का?

सांज सरिता वाटेवरती

घेऊनि चालतो तुझ्या पाऊलखुणांना सोबती

साथ देऊनी या प्रेमवाटेवरती

सावली बनुनी चालशील का?


Rate this content
Log in