श्री गणेश वंदना
श्री गणेश वंदना
नमीतो तव चरणासी । गजानना वरदायका ।
वरद विनायक तुमची महती । ईच्छापूर्ती तव कृपेनी ।
मंगलमुर्ती गणाधीपती । महड निवासी जग उद्धारी ।
विद्या बुद्धी भक्तां वरसी शरण तुम्हांसी महागणपती ।
नमीतो तव चरणासी । गजानना वरदायका
तुम्ही कृपेची सदा सावली । स्मरण करता कार्य सिध्दी ।
दर्शन घेता दु:ख हरती । पाप सरती मोक्ष प्राप्ती ।
नामस्मरणे आत्मशक्ती । भक्ति रसाची नवी अनुभूती ।
नमीतो तव चरणासी । गजानना वरदायका ।
यत्रा करता मन आनंदी । विघ्ने टळती भय पळती ।
सगुण स्वरुप प्रसन्न मुर्ती । ह्रदयी सदैव कोरुन नेती ।
भव सागरी या तरुन नेसी आत्मसुखाची येई भरती
नमीतो तव चरणासी । गजानना वरदायका ।
कला संस्कृती तुमच्या दासी । सर्व सिद्धी आम्हां लभती ।
तुम्हां समर्पीत कलाकृती । कला सेवेची अनुमती द्यावी. ।
नमीतो तव चरणासी । गजानना वरदायका ।