कविता ही ( अभंग रचना )
कविता ही ( अभंग रचना )
दुःखीतांंची जाण I लढण्याची आण ॥
ठेवी ताठ मान l कविता ही ॥१॥
दुबळ्यांचे शस्त्र I वंचिताचे अस्त्र ॥
पांघरण्या वस्त्र | कविता ही ॥ २॥
रुढींवर वार I परंपरा मार ॥
लेखनीत धार I कविता ही ॥३॥
दुबळ्यांची वाणी I पाजतसे पाणी ॥
सदा ध्यानी मनी I कविता ही ॥ ४ ॥
शब्द शब्द गुंफी । रचना घडती ॥
दाद मिळवती I कविता ही ॥ ५ ॥
सर्वांची जीवनी I सांगते कहानी ॥
कोरलीय मनी | कविता ही ॥ ६ ॥