व्योमगंगा
व्योमगंगा
साठणारा हा पसारा आजवेळी आवरावा ?
जीवनाचा व्हास आता आज मी का आचरावा ?
रानवारा आठवांचा काळजाशी थांबला हा
भावनांचा हा फुलोरा पाठमोरा का धरावा ?
वेदनांचे चोचले या काळजाला दु:ख देती
नाहकच मी वेचितो अन सोसतो मी घाबरावा?
शांत आता श्वास घेतो संघर्षांला जाळण्याला
साह्य करतो मौन माझा मोह मीही का भरावा ?
आतमधली आत्मज्यौती संगतीला कारणेही
तो कसा हटवाद कूणाला प्रहारा का करावा ?