गरज पुस्तकांची ( अभंग रचना )
गरज पुस्तकांची ( अभंग रचना )
1 min
13.6K
वाढतसे ज्ञान I मिळतो तो मान ॥
समाज सन्मान | वाचनाने ॥१॥
वाचन हे असे | अन्न ते मनाचे ॥
ते पुरवायचे I पुस्तकाने ॥२॥
खरा खोटा भेद I करतसे दूर ॥
घेतसे माघार I तो संभ्रम ॥ ३॥
करण्या अभ्यास | वाचन सोबत ॥
करतो मदत | रात्रंदिन ॥४॥
गरज भासते | सदा पुस्तकांची ॥
जोड संदर्भाची I लावण्यास ॥५॥