Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!
Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!

Prashant Shinde

Others

3  

Prashant Shinde

Others

व्हॉट्सप शिवाय दोन दिवस..?

व्हॉट्सप शिवाय दोन दिवस..?

1 min
388


काय भन्नाट कल्पना

डोक्यात आली

मी सत्वर

त्याची तयारी केली


अँड्रॉईड मोबाइल

सरळ ऑफ केला

छोटा डबीचा

फोन खिशात घातला


बाहेर पडलो

काहीतरी हरवल्यासारखं झालं

कुठंतरी थोडं

काळीज फाटल्यासारखं वाटलं


कोणे एके काळी तारुण्यात 

जी घालमेल ती नजरेआड झाल्यावर व्हायची

तीच घालमेल ती नजरेस पडल्यावर

आपोआप नाहीशी व्हायची


तसंच काहीतरी चालू झालं

व्हॉट्सपनं डोकं फिरवलं

भानावर येता संकल्प आठवला

डोक्यातलं खूळ दूर पळालं


आता खरंच बरं वाटतं

व्हॉट्सपविना संसाराचं गाडं चालतं

प्रेयसीपेक्षा तिचं कौतुक वाटतं

जेव्हा आपलं जुनं ते सोनं हे पटतं....!



Rate this content
Log in