काय माझे राहिले ?
काय माझे राहिले ?
प्रेमात तुझ्या पडता
काय काय की जाहले
मन तुझ्यात गुंतता
काय माझे राहिले ?
कशी जादू केलीस तू
असे नव्हते घडले
तुजला सखे पाहिले
बाकी सारे विसरले
मन भरेना भरेना
तुजविना हे रमेना
यावे भेटीस आता तू
तुजवाचून करमेना
सास्मित मुखचंद्रमा
यास नको अन्य उपमा
तुझ्यात मन विरघळले
काय माझे राहिले ?