Become a PUBLISHED AUTHOR at just 1999/- INR!! Limited Period Offer
Become a PUBLISHED AUTHOR at just 1999/- INR!! Limited Period Offer

Amogsiddh Chendake

Classics

2  

Amogsiddh Chendake

Classics

धीर

धीर

1 min
8.1K


सत्याचा जिव्हाळा मनाची स्वच्छता || चित्तास स्वस्थता || जेथे आहे ||१||


जेथे जागा धीर सदा हृदयात || सत्यवर्तनात || खच्ची घाला ||२||


पिडा दुःखे सोशी संकटे निवारी || गांजल्यास तारी || जगामाजी ||३||


धीर धरूनीया सर्वा सुख देती || यशवंत होती || जोती म्हणे ||४||


(२)


धीर सोडीताच शुद्रा दास केले || आर्याजी ताठले || ऐश्वर्यात ||१||


भित्रे शुद्र वेडे अज्ञानी बापुडे || आर्य पाई पडे || लज्या गेली ||२||


अज्ञानी म्हणूनी म्लेंच्छानी लढले || प्राणाशी मुकले || आर्यापाई||३||


शूर मांगमहारा आर्ये नागविले || पशूवत केले || जोती म्हणे ||४||


Rate this content
Log in