Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!
Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!

Dinesh Kamble

Romance

4  

Dinesh Kamble

Romance

तू तिथे मी

तू तिथे मी

1 min
12.2K




घेतां तुझा हात हाती ,

गुफीली तुझसवें प्रिती .


ठेवुनि साक्षी अंतरात्में आपुली,

देतो मी एकाच गोष्टीची हमी .


राहील सदैव तू तिथे मी ...


कुंजवनांतल्या फुलांसवे ,

सांग असतो न गंध

बेधूंद करणारा ?


पावसाच्या पहिल्या सरीसवे ,

उधळला जातोच ना गंध

मनसोक्त असा दरवळनारा ?



प्रियतमा हा दाखला सृष्टिचा ,

देतो याची मी हमी .


राहील सदैव तू तिथे मी..



पायी तुझ्या पैंजण ,

तिचे अंगणभर गुंजण .


कांकण तेथे कीनकीन ,

पैंजण तेथे छुमछूम .


सखे नांद जसा त्या,

त्या घुंगरा सवे असतो.


राहील सदैव तू तिथे मी



येऊ दे वादळं की उनाड वारा ,

मी बनेल तुझा सहारा .


तू काळोख्या रात्रीला ,

भिक नको घालू .


काटेरी मार्गावर ,

अडखळत नको चालू.


आत्मविश्वासाची नको कमी ..


राहील सदैव तू तिथे मी..


या धूमचक्रीत जीवनात,

होऊ दे तुझा हि जयजयकार .



दाही दिशांला पसरेल ,

तुझ कर्तव्य अपार.



आव्हाने स्वीकारण्या जीवनाचे ,

लीलया पेलन्या ती तू घे पुढाकार.



झुंझ तू नियतिला दे नामी.


राहील सदैव तू तिथे मी...


Rate this content
Log in

Similar marathi poem from Romance