Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!
Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!

Shital Yadav

Inspirational

2  

Shital Yadav

Inspirational

मन कृतज्ञतेने भरते

मन कृतज्ञतेने भरते

1 min
6.9K


आई वडिलांनी प्रेमाने लहानाची मोठी केली 

जीवापाड 'कन्या' रुपी पणती ही जपली

तीच जपलेली पणती सासरी मंद तेवते

निःस्वार्थ प्रेमाने माझे मन कृतज्ञतेने भरते

सप्तपदी घेऊनी सख्या जुळले हळवे नवे नाते

तू श्वास जीवनाचा, तुझ्यामुळेच प्रीती बहरते

मधुर, सोनेरी नात्यांचे सप्तरंग नभात उधळते

तुझ्या प्रेममय सावलीत मन कृतज्ञतेने भरते

ग्रीष्मातल्या वणव्यात वसुंधरा ही धगधगते

श्रावणसरीत चंदेरी थेंबे हरिततृणात डोलते

सोन्यासारखी पीके कष्टाने शिवारात डुलते

बळीराजापुढे नतमस्तक मन कृतज्ञतेने भरते

भारत भूसाठी शेकडो वीरांनी अर्पिले प्राण

सीमेवर लढतांना तनीमनी देशाभिमान

देशभक्ति ज्वालेने आसमंत उजळून येते

सैनिकांच्या कर्तृत्वाने मन कृतज्ञतेने भरते

शब्दसुमने जुळूनी अलवार काव्य बनते

भावनेच्या धाग्यात हळूवार त्यास ओवते

कवितेची करुनी आरती हृदयातून ओवाळते

शतदा नमन तुज शारदे मन कृतज्ञतेने भरते

 

 


Rate this content
Log in

Similar marathi poem from Inspirational