आर्जव!!
आर्जव!!
1 min
314
आज तुझ्या कडे पाहताना
मन भरून येते
तेज्यात तुझ्या न्हाताना
खूप बरं वाटते
आभा तुझी नभी खुलताना
आसमंत तेजोमय होतो
मळभ दूर होताना
सुखे मन मोरही नाचतो
किमया तुझी अशी
साऱ्या जगतास वेड लावणारी
आळसटल्या जीवांना
ऊर्जा नवं जगण्यास देणारी
नमन असो तुझ्या चरणी
माझी ही लागुदेत वर्णी
तुझी जाणतो मी देवा
अगाध आहेच रे करणी
तुझ्या मायेत आम्हा लेकरांना
आसरा सदैव घेऊ देरे
तुझ्या चरणी आम्हाला
अखंड राहू देरे.....!""""