आला फुलोरा
आला फुलोरा
1 min
470
आला फुलोरा बघुन सजवतो आकाशाला
राखीव तारा हसुन समजतो आकाशाला ।।
मिलाप होता टिपून लाली ओठावरची
डोळ्यात पाणी दडवुन जातो आकाशाला ।।
काट्यातही तो गुलाब दिसे इतका सुंदर
झोका हवेचा उडवुन छळतो आकाशाला ।।
वादे कराया विचार नाही फासायाला
वारा पळे हळूच माणुस पळतो आकाशाला ।।
वेडावला का लता फुलांचा गजरा माझा
आशा अपेक्षा घेऊन जगतो आकाशाला।।
तळमळुन गाणे गळ्यात अडतय गातागाता
आसावरीचा भुगाच पडतो आकाशाला।।