Become a PUBLISHED AUTHOR at just 1999/- INR!! Limited Period Offer
Become a PUBLISHED AUTHOR at just 1999/- INR!! Limited Period Offer

Rajesh Sabale

Others

2  

Rajesh Sabale

Others

हिरवं रान

हिरवं रान

1 min
6.9K


तुला पाहण्याअगोदर, मन रखरखीत वाळवंट होतं।

अन तुला पाहून त्याचं आता, हिरवं रान झालं होतं।।धृ।। 

दिवसाढवळ्या भर उन्हात, मन माझं जळत होतं।

अन तुझ्या एका स्पर्शासाठी, मन माझं झुरत होतं।।

गतकाळ विसरण्यासाठी, मन सैरभैर फिरत होतं।

अन तुला भेटण्यासाठी, रोज तुझ्या माग फिरत होतं।।

एकदा जरी दिसलीस तरी, मन ओलं चिंब होतं।

अन सकाळच्या दवात, आता थोडं भिजल होतं।।१।।

 भेगाळलेल्या मनात आता, मळभ थोडं दाटलं होतं।

अन तुझ्या भेटीसाठी नभात, मेघ होऊन फिरत होतं।।

पडेल पाऊस आता तरी, मनात नुसतं भासत होतं।

अन तुला भेटण्यासाठी, मन चिंब भिजून येणार होतं।।

वाटलं होतं पावसात मला, बिलगून तुला बसायचं होतं।

अन अंधारलेल्या नभात, विजेसारखं चमकायच होतं।।२।।

उजळून निघेल आसमंत असं, घडीभर जरा वाटलं होतं।

अन किल्मिश तुझ्या मनातलं, मेघ गर्जनेत दिसणार होतं।।

पण ढगांचा गडगडाट अन, विजांचा कडकडाट झाला नाही।

अन तुझ्या मनातलं खरं प्रेम, मला कधी कळलंच नाही।।

धरणीमाता आणि पावसाचं प्रेम, पूर्वीपासून असच होतं।

अन इंद्रधनूच्या कमानी खालून, हिरव्या शालूत दिसत होतं।।३।।


Rate this content
Log in