हास्य ( अभंग रचना )
हास्य ( अभंग रचना )
हास्य
( अभंग रचना )
एक तो गोरीला I रुसुन बसला |
हट्टास पेटला | हसेनाच ॥ १ ॥
एक ती ललना | जिद्दीस पेटून |
दाखवी हसून I गोरीलाला ॥ २ ॥
दोन्ही ती पाहती | एकमेकाकडे I
पूर्वज माकडे I माणवाची ॥ ३ ॥
हास्य असे गाली | सर्वांच्या शोभते l
खुलून दिसते । मुखावरी ॥ ४ ॥
दोघांची ती जोडी | दिसते शोभून |
सिनेमा दर्शन | परदेशी ॥ ५ ॥
किशोर झोटे,
औरंगाबाद