एकटी
एकटी
1 min
20.9K
केलं लहानांच थोर
सोसलं कष्ट सार
मी एकटीच रं
शिकवलं शिक्षण सारं
उपसलं कष्टांच भारं
मी एकटीच रं
तुझ्या पायावरं
उभ केलं रं
मी एकटीच रं
तुझी उंच भरारी रं
माझ्या पाखरा रं
मी एकटीच रं
घेशील जरी झेप रं
विसरून जाऊ नगं घरटांला रं
मी एकटीच रं
तुझंवीन मातृत्व अधूरं
तुझवीन घरपण अधूरं
मी एकटीच रं