जगावे! प्रतिबिंब पाहून!
जगावे! प्रतिबिंब पाहून!
1 min
1.2K
विश्वास पाठीशी,
सदा त्याचा हात,
त्रास होउनी
केलिया मात,
पाऊलं टाकावे,
विचार करून
जगावे प्रतिबिंब पाहून!
संकटे भेटती,
सुक्या गगनात,
ढग गर्जती,
ओल्या अंगणात,
आयुष्य पहावे
विश्वास सोडून,
जगावे! प्रतिबिंब पाहून
पाने गळती आता
ओल्या झाडांची सारे,
जग खोटे बोलूनी
खोट्याला खरे पाडे,
न्याय मिळावे,
हात जोडून,
जगावे! प्रतिबिंब पाहून
साथ सोडती
पेटत्या दिव्याची वात,
सांगावे तरी कसे
कोण करील केव्हा घात,
सुख पहावे
अंधश्रद्धांना तोडून,
जगावे! प्रतिबिंब पाहून!