Become a PUBLISHED AUTHOR at just 1999/- INR!! Limited Period Offer
Become a PUBLISHED AUTHOR at just 1999/- INR!! Limited Period Offer

Arun V Deshpande

Others

2.4  

Arun V Deshpande

Others

एकांतात तू तुझ्या असतांना

एकांतात तू तुझ्या असतांना

1 min
13.9K


एकांतात तू तुझ्या असतांना 

अवचित येउनी मी बसतो 

डोकावतो नजरेत तुझ्या त्या 

रम्य आठवणी पुन्हा बघतो …!

हरवूनी जाणे आठवणीत 

विरंगुळा तुझ्या मना असतो 

झुला आठवणीचा तो झुलतो 

एकांतात तू तुझ्या असतांना …!

प्रेमाची अमित अक्षरे ती 

पत्रातुनी झरझर झरती 

विरह-अश्रूंची झड लागते 

एकांतात तू तुझ्या असतांना .!

व्याकुळ मन तुझे विचारे 

संपणार कधी रे एकलेपणा 

शोधीतेस तू उत्तरे प्रश्नांची 

एकांतात तू तुझ्या असतांना …!


Rate this content
Log in