*शारदेय*
*शारदेय*
1 min
294
घर माझे
टुमदार.
अंगणही
छानदार.
अंगणात
वटवृक्ष
ममतेची
देतो साक्ष.
झाडावर
चिऊ,काऊ.
घरामध्ये
कुत्तु ,माऊ.
रंगावली
दारापुढे.
डुले छान
झाडेझुडे.
आतिथ्याची
आम्हा घाई.
याचक ना
रिक्त जाई.
आसवांना
नाही थारा.
आनंदाचा
वाहे वारा.
बात एक
खरी मोठी
गोड बोल
साऱ्या ओठी.
नांदे जिथे
ऐक्यभाव
'शारदेय'
त्याचे नाव.