Become a PUBLISHED AUTHOR at just 1999/- INR!! Limited Period Offer
Become a PUBLISHED AUTHOR at just 1999/- INR!! Limited Period Offer

Arun V Deshpande

Romance

2  

Arun V Deshpande

Romance

कविता -साज आणिक कशाला ?

कविता -साज आणिक कशाला ?

1 min
7.2K


 

अथांग सागरा जसे

भावगर्भी डोळे तुझे

किनाऱ्यास त्यांच्या आता

काजळकाठ कशाला ?

महिरप कुरुळ्या केसांची

गोडी चेहेऱ्याची वाढवी

नागीण वेण्यांचा वेढा

आता आणिक कशाला ?

भासती ओठांच्या कळ्या

नाजूक गुलाब पाकळ्या

लेप लालीचा वरती

आता लाविशी कशाला  ?

सुंदरतम तू सखे

साज आणिक कशाला?

घायाळ झाल्या मनाला

आणिक शिक्षा कशाला?


Rate this content
Log in