कालिदास
कालिदास
1 min
266
म हान कार्य असे प्रतिभेचे
हा लाकीच्या जीवनातून स्फुरले
क ळी काळाची जिद्द दाऊनी
वि चार शलाका अमर झाली...
का लचाच कवी वाटावा
लि खाण असे जमले ज्याला
दा स होतील चिरंतन कविवराचे
स न्मान देण्या याच्या लेखणीला...
स्मृ ती पटलावर सदा विराजे
ती अन त्याची काव्यकृती सदैव
दि वसा मागून दिवस जातील पण
न अंत लाभे यांच्या कलाकृतीस ....
हेचि सत्य चिरंजीव राहील सौभाग्य
कालिदास महाकवी अजरामर
अकाली अनाकलनीय अंत
आमचे हेचि देवा दुर्भाग्य.....!