माझा लोभ नाहीं देवा
माझा लोभ नाहीं देवा
1 min
7.3K
माझा लोभ नाहीं देवा ।
तुझी करीं ना मी सेवा ॥१॥
नाहीं अंगीं थोरपण ।
मिथ्या धरिसी गुमान ॥२॥
रामा येऊनि काय करिसी ।
तुझें बळ आम्हापासीं ॥३॥
नाहीं सामर्थ्य तुज हरी ।
जनी म्हणे धरिला चोरीं ॥४॥