Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!
Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!

Abasaheb Mhaske

Inspirational

2  

Abasaheb Mhaske

Inspirational

मरायचंच तर

मरायचंच तर

1 min
6.6K


कैकदा फाटले आभाळ, सोसला दुष्काळ

मनगटावर तुझा होता केवढा विश्वास ?

स्वतः अर्धपोटी तरीही तू सा-यांनाच प्रेमाचा घास भरवलास

निसर्ग आणि नियतीपुढे तू कधी झुकला नाहीस

मरायचंच तर खुशाल मर,  त्या आधी  परिस्थितीशी दोन हात कर

सततची नापिकी अनं पाचवीला पुजलेली गरिबी

पोरीचं लगीन, पोराचं शिक्षण, सावकाराचं देणं

सारं सारं आयुष्याचं गणित चुकत गेलं अनं तू अविचारी बनलास

मरणानं प्रश्न सुटत नसतात रे, ते आणखीनंच चिखळतात

मरायचंच तर खुशाल मर, पूर्वजांची मान अभिमानानं उंचावेल असंच मर

मरण तर पळपुटेपणा  पळणे तुझ्या रक्तातंच नाही

लढून मर पण स्वतःची जीवनयात्रा संपवून उरलेल्यांना जित्यापणी नरकयातना देवू नकोस

तुझ्या मदतीस याआधीही  कुणी आला नाही, अनं नंतरही येणार नाही

जन्मभर सोसला वनवास, कायमचं दुःख - दारिद्र्य तुला वारसानं मिळालं

मरायचंच तर खुशाल मर पण,  त्याआधी बायकोसहीत चिल्या- पाल्याची खोद कबर

 पत्थराला तू पाझर फोडलास अनं मातीतून मोती पिकवलेस

ओसाड माळरानं फुलवून तूच आम्हास आशावादी जगणे शिकवलेस

जगाचा पोशिंदा तूच, तूच जीवनाचा खरा शिल्पकार बनलास

अरे बाबा अयुष्याचं कोडं सोडवणं अवघडंच, पण अशक्य मात्र कधीच नसतं

मरायचंच तर खुशाल मर पण,  त्या आधी वाघासारखं जगून बघ, वाघासारख जगून बघ.

 

 


Rate this content
Log in

Similar marathi poem from Inspirational