खेळ जीवनाचा ...
खेळ जीवनाचा ...
1 min
280
खेळ पाठशिवणीचा - खेळ रातसावल्यांचा,
पुडे मागे-मागे पुडे - झुलणाऱ्या काळोखाचा,
खेळ गतकाळाचा - खेळ भविष्याचा,
कडू गोड-गोड कडू - मनातील आठवणींचा,
खेळ तुमचा आमचा - खेळ आहे जीवनाचा,
उभ्या आडव्या तिरप्या - हातावरील रेषांचा,
खेळ खेळता खेळता - जीवनाचा अंत होतो,
परी जगरहाठीचा - खेळ चालूच राहतो.