Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!
Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!

अंजली (Anjali) बुटले (Butley)

Others Inspirational

5.0  

अंजली (Anjali) बुटले (Butley)

Others Inspirational

चिखलात उमलणार्या कमळफुला!

चिखलात उमलणार्या कमळफुला!

1 min
532


चिखलात उमलणार्या कमळफुला

ऐकली होती तुझी खुप स्तुती!


ओढ लागली माझ्या मनाला

तुला जवळुन बघावे फुलतांना!


...पण ते कसे बघावे

न कळे मला!


लांब तळ्यात तु

उमललेले पाहिले होते!


देवीला अर्पण करण्यास

विकत घेतले ही होते!


... पण तुला चिखलात उमलतांना

जवळुन बघायचे होते एकदा!


मग विकत आणले 

तुझे छोटेसे कंद-रोपटे!


घरातच तयार केले

तुझ्यासाठी छोटे तळे!


त्या छोट्या तळ्यात

तयार केला चिखल मातीचा!


धष्टपुष्ट व्हावे कंद-रोपटे

म्हणून सोबत घातले त्यात शेणखत आणि गप्पीमासे!


सज्ज झाले एक नविन जग

तुझे चिखलात उमलण्यासाठीचे!


सात-आठ महिने झाले

नुसतीच नविन पाने आलीत!


रूबाबात उमलत असायची

तुझी पाने त्या चिखलात!


खट्टू मन झाले होते

तु उमलले नाही अजुन म्हणुनी!


तेवढ्यात तु वर्दी दिलीस

तुझ्या येण्याची एका पाना आडून!


मग लळा लागला

तुला रोजच न्याहाळण्याचा!


मन आल्हादुन जात असे....

तुझे ते नवं नवे रूप बघतांना!


तुझे कले-कलेने 

पाण्यावर डोके वर करून बाहेर येण्याचा!


सुर्योदयानंतर सुर्यकिरणांच्या उबदारीतून

आतुन बाहेर हळुहळू फुलतांना!


वार्या बरोबर ताठमानेने झुलतांना!


फुलात पुर्ण रूपांतर झालेले

तुझे रूप डोळ्यात साठवतांना!


आपल्याच धुंदीत आनंदुन बहरतांना!


कसा कुठून तो एक भूंगा पण आला

तुझ्या भोवती पिंगा घालण्यास!


निसर्ग नियम पाळत 

सुर्यास्ताच्या आत हळुहळू परत कळीत रूपांतर होतांना 

मनी ठेवतो आशा उद्या ताठ मानेन उगवायचं!


चिखलात उमलणार्या कमळफुला

जिवन उत्सव आहे फक्त ३-४ दिवसांचा!


...पण लळा लावुन जातो तो

तुला पाहत आपल्याच धुंदीत

जिवनासाठी आपली उर्जा 

आपणच कशी निर्माण करायची

चिखलात राहुनी 

हे शिकण्याचा!!!


Rate this content
Log in