Become a PUBLISHED AUTHOR at just 1999/- INR!! Limited Period Offer
Become a PUBLISHED AUTHOR at just 1999/- INR!! Limited Period Offer

Kavita Pudale

Classics

0  

Kavita Pudale

Classics

संसार सुरुवात करताना

संसार सुरुवात करताना

1 min
967


संसार सुरुवात करताना

फूलवायचे असते दोन नात्यांना

प्रफुल्लीत आनंदी ठेवायचे असते.


सुखदुःखाच्या प्रत्येक क्षणांना

सामोरे जातांना

हसतमुखाने सामोरे जायचे असते .


संसाराची नाती वीणतांना

असंख्य गुंतागुंतीना

हळूवार सोडवायचे असते.


नात्यांच्या धाग्यांना

एकत्रीत गुंतवतांना

नात्यांना दृढत्व द्यायचे असते .


सांभाळायचे नात्यांना

साऱ्यांच्या भावनांना

नाते दृढ करायचे असते .


संसाराच्या वेलींना

वात्सल्यचे जल करावे अर्पण

संसार वेलीला बहरायचे असते .


फूलवायचे असते वेलींना

आनंदी ठेवायचे सर्वांना

संसाराला फूलवायचे असते.


संकटांच्या वादळांना

वेदना ही होतात थांबवताना

खंभीरपणे सामोरे जायचे असते


सुखदुःखाच्या दोन बाजूना

ह्यालाच संसार म्हणायचा ना !

सदैव आनंदात राहायचे असते


जीवन वेलींलाना फूलवताना

येणाऱ्या यशरूपी फळांना

सदैव जिंकायचे असते


Rate this content
Log in