Become a PUBLISHED AUTHOR at just 1999/- INR!! Limited Period Offer
Become a PUBLISHED AUTHOR at just 1999/- INR!! Limited Period Offer

Prashant Shinde

Others

3  

Prashant Shinde

Others

एक वल्ली

एक वल्ली

1 min
409


वल्ली भेटला मला

म्हणाला

तुम्ही असे का लिहीत नाही

तुम्ही तसे का लिहीत नाही

तुम्ही असे का लिहिता

तुम्ही तसे का लिहिता


म्हटले,

याला नेमके म्हणायचे आहे तरी काय?

थोडे थांबून तोच म्हणाला

लिखाण कसं आतडं पिळवटणार पाहिजे

आतडी बाहेर काढणारं पाहिजे

धारदार पाहिजे, अर्थपूर्ण पाहिजे

टचकन टोचणार, बोचणार पाहिजे

खसकन खुपणार पाहिजे


समजलं मला

म्हटलं

वेदना मी पहात नाही

वेदना मला दिसत नाही

वेदनेचं जीणं मी जगत नाही

वेदनेच जीणं जगवत नाही


बाबा रे 

दृष्टी तशी सृष्टी

तू ही तसंच कर

जग सुंदर आहे

बंदर होऊन जगण्यात काय अर्थ आहे...?


म्हटलं एवढंच कर

मी चांगला 

तर जग चांगलं समज

जीवनात वाईट असं काही दिसणार नाही

जीवनात वाईट असं काही असणार नाही

वाईट असं काही घडणार नाही

वाईट असं काही होणार नाही


बहुतेक त्याला पटलं

तो इतकंच म्हणाला,

सर तुमच्या कविता, लिखाण 

मला खूप आवडतं


बरं वाटलं

म्हटलं साधं सोपं जीण असावं

त्यात दुःखाला स्थान नसावं

जणू सौख्य समाधान शांतीचं

ते अनमोल आंदण असावं....!



Rate this content
Log in