Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!
Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!

Abasaheb Mhaske

Others

3  

Abasaheb Mhaske

Others

कविता कवीसाठी

कविता कवीसाठी

1 min
13.8K


कविता कवीसाठी काय असते ? 

दुधावरची साय असते 

हंबरनारी गाय असते 

कुटुंबवत्सल माय असते 

कविता कवीसाठी काय असते ?

न बुजणारा घाव असते 

अंतर्मनाचा ठाव असते

विविधतेतून एकसंघ गाव असते 

कविता कवीसाठी काय असते ?

कल्पनेचा स्वछंद विहार असते 

सात्विक पोषण आहार असते 

असह्य वेदनेचा तिहार असते 

कविता कवीसाठी काय असते ?

प्रतिभेतून साकारणार फूल असते 

गर्भार जमिनीवरच मुल असते 

नकळत केलेली भूल असते 

कविता कवीसाठी काय असते ?

न्यूनतेने भरलेला दुःखाचा भडीमार असते 

कधीच न भरून येणारी सल असते 

तरीही मूल्यवर्धित अगम्य आशावाद असते 

कविता कवीसाठी काय असते ?

हताश गळ्याचा फास असते 

डोळ्यात झणझणीत अंजन असते 

रात्रंदिनी देव्हार्यात जळनारी निरंजन असते 

कविता कवीसाठी काय असते ?

इच्छा असो या नसो ती तर असतेच 

हृदयात सलते , कधी अनिवार स्मरते 

लेखणी कधी निष्प्रभ , कधी बोलकी होते 

कविता कवीसाठी काय असते ?

सदैव झुरणारी माय असते 

भावनांचा कल्लोळ , नसानसात भिनते

असून अडचण नसून खोळंबा जणू कवीची सावली असते 


Rate this content
Log in