Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!
Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!

Smita Murali

Others

3  

Smita Murali

Others

तिच्यासाठी एकदिवस

तिच्यासाठी एकदिवस

1 min
218


*तिच्यासाठी एक दिवस*


शब्दविद्या परिवाराने जमविला

आज काव्यसख्यांचा मेळा

तिच्यासाठी एक दिवस म्हणत

सावित्रीच्या लेकी झाल्या गोळा


प्रत्येक लेक साऊची आज

घेत आहे कर्तृत्वाची भरारी

अनेक अडचणी पेलते ती

प्रसंगी करुन संघर्ष तयारी


चूल-मूल सासर माहेर

सगळं सांभाळत करते नोकरी

समाजऋण फेडत फेडत

कष्टाची दररोज थापते भाकरी


सख्यांना भेटायला आले आज

बाजूला सारुन अडचणी न् बंधन

डोळेभरुन पाहिन हा सोहळा

कानांना तृप्त करेल काळीजकोंदण


झटली क्रांतीज्योती सावित्रीमाय

तेंव्हा मिळालं स्त्रीशिक्षणांच फळ

अशाच सर्वजण संगतीने राहू

वाढवू आपणच आपलं बळ


अथांग आभाळ यशाच खुलं

उडा सख्यांनो स्वतःच्या कलेनी

शिक्षणामृत पाजलयं आम्हाला

जोतिबा आणि सावित्री फुलेनी


बहिणी आमच्या वंचित कोणी

विकासापासून राहिल्या मागे

चला सख्यांनो प्रयत्न करुया

त्यांनाही करुया वेळीच जागे


शिक्षण घेवू नि शिक्षण देवू

सावित्रीमाईचा चालवू वसा

लेकी साऱ्या सावित्रीच्या

जगी उमटवू कर्तृत्व ठसा!!!


Rate this content
Log in