पांडुरंग
पांडुरंग
1 min
301
(अनुस्वार चाराक्षरी)
पांडुरंग
पंढरीचा
देव माझा
अंतरीचा.
चंदनाचा
टिळा भाळी
साजे रूप
चंद्रमौळी.
पितांबर
कटी अंगी
शोभे अति
शाम रंगी.
भक्त दंग
ते भजनी
गाती भाव
संकीर्तनी.
भगवंता,
भेट घडो
'विठुनाम'
छंद जडो.