बाजार माणसाचा
बाजार माणसाचा
1 min
13.4K
बाजार माणसाचा
व्यापार झाला आता
कुठे ही मिळेणा काम
जगणे कठीण आता ------||
घायाळ लेकूरे ही
खिशात पैका नाही
उरात आग माझ्या
जीवाची होते लाही ----||
घरात बायको माझी
जाळून जीवास गेली
सणास कोनत्याही
साडी कधी न मिळाली ----||
विज्ञानाच्या जगात
माणूसकी उरली नाही
गर्भात बालकाचा
घेणारी प्राण आई -----||
स्वार्थी जगास माझ्या
दृष्ट कुणाची लागे
माणूस मानसात
पशू समान वागे ------||