Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!
Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!

kishor zote

Inspirational

3  

kishor zote

Inspirational

बुध्द आणि त्याचा धम्म

बुध्द आणि त्याचा धम्म

1 min
14.4K


बाबासाहेबांनी | शोध तो घेतला ॥

शरण बुध्दाला I दीक्षाभूमी ॥१॥


अनमोल ग्रंथ I बुध्द आणि धम्म ॥

कळण्या सद्धम्म | रचियेला ॥२॥


पहिला तो खंड I तो बालपनाचा ॥

हा परिव्रज्येचा | साम्यभेद ॥३॥


धम्म दीक्षेची हो I होती ती मोहिम ॥

दाखवी संयम | खंड दोन ॥४॥


काय शिकवले ? | माझ्या हो बुध्दाने ॥

धम्माच्या वाटेने I खंड तीन ॥५॥


धर्म आणि धम्म I चौथ्या या खंडात ॥

भेद ते स्पष्टत I प्रवचने ॥६॥


पाचव्या खंडात I नियम संघाचे ॥

तसेच भिक्खूचे | उपासका ॥७॥


ते समकालीन I त्याचे समर्थक ॥

तसे विरोधक I षष्ठ खंड ॥८॥


अंतिम ती यात्रा I वैशाली निरोप ॥

चिरंतन झोप | खंड सात ॥९॥


बुध्द व्यक्तीमत्व | आठव्या खंडात ॥

संवाद साधत | जनमना ॥१०॥


आठ त्या खंडात | सार सांगीतले ॥

सर्वांस रुचले I मनोभावे ॥११॥


Rate this content
Log in

Similar marathi poem from Inspirational