Become a PUBLISHED AUTHOR at just 1999/- INR!! Limited Period Offer
Become a PUBLISHED AUTHOR at just 1999/- INR!! Limited Period Offer

yuvaraj jagtap

Tragedy

2.2  

yuvaraj jagtap

Tragedy

व्यसन दुष्परिणाम व व्यसनमुक्

व्यसन दुष्परिणाम व व्यसनमुक्

1 min
19.9K


व्यसनाची हो वाट।जीवनास नाट।।

होते बरबादी । आयुष्याची ।।


सिगारेटचा तो धूर।फुफुस चक्काचूर।।

बेडके,खोकल्यास। आमंत्रण सर्वदा।।


तंबाखूचा तो विडा । सडवी जबडा।।

कॅन्सरला आमंत्रण । देई जे ।।


दारूची ती नशा । मोह हवा कशा ।।

पडती आतड्यास भोके । आपल्याची ।।


पुडी ती गुटख्याची । दुर्गंधी तोंडाची ।।

समोरचा न थांबे । आपल्यापुढे ।।


माव्याची ती सुपारी । दाततोंड रंगवी ।।

बोलताच बत्तीशी दिसे । काळीकुट्ट ।।


नका पिऊ दारू । जीवन सुधारू ।।

उधळू आनंदी आनंद । चौफेर ।।


बिडी,सिगारेट, गांजा । धुराचा लोट ।।

ठेवावा दुरचं सदा । सर्वांनी ।।


गुटखा,मावा,सुपारी । सगळे विषारी ।।

तोंडाचे वाटोळे करता । कशापायी ।।


तंबाखू ला चुना । नाका आता लावू ।।

राखू मुख आरोग्य । अबाधित ।।


सोडूनी धूम्रपान । काढूनी घाण ।।

जगुया जीवन । आनंदाने।।


Rate this content
Log in