पावसाने केली भलतीच कमाल
पावसाने केली भलतीच कमाल
दुपारच्या सुट्टीची
काय सांगू धमाल
पावसाने केली ना
भलतीच कमाल ।।धृ।।
आईने पाठविले
दुकानात मला
चहासाठी साखर
पत्ती आणायाला
धो धो पाऊस
तितक्यात आला
साखरेचा पुडा
भिजुनिया गेला
आई झाली रागाने
लालमलाल।।1।।
चकाकती कडक
पाहुनिया धुप,
काकुंनी धुतले
कपडे खुप,
घामाच्या धारांनी
निथळले रूप
इतक्यात आला
पाऊस टुपटुप
धूणे काढताना
काकुंचे हालहाल।।2।।