कशाला
कशाला
1 min
14.3K
फुलाला सजण्यां फुले ते कशाला |
फुलाला झुलायां झुले तै कशाला |
सदाही फुलाने डुलावे मनाने
फुलाला छळण्यास काटे कशाला |
तुलाही कळावे असे दु:ख त्याचे
कळी तोडतांना कुठारी कशाला |
चिमण्या अता त्या फिरूनी ग याव्या
चिमण्यांंचं धुराडं येथे कशाला |
असे मोहरावे गुलाबानं येथे
क्षणी पावसाने झडावे कशाला |
(भुजंगप्रयात)
लगागा | लगागा | लगागा | लगागा