महापूर
महापूर
मेघ काळेकुट्ट आले
घनघोर बरसले
नृत्य तांडव करून
कसे थैमान घातले ।।१।।
क्षणार्धात पावसाने
नदी नाले फुल्ल झाले
सारे किनारे सोडून
तेव्हा धावाया लागले ।।२।।
घरदार गुरे-ढोरे
भांडीकुंडी वस्त्र वित्त
गेले वाहून पुरात
सारे डोळ्याच्या देखत ।।३।।
माय बाप मुले बाळे
कसे हतबल झाले
महापूरी विळख्याने
वाहुनिया सारे नेले ।।४।।
किती धावाधाव केली
सारा संसार जोडला
काळरुपी पावसाने
एका क्षणात मोडला ।।५।।
महापूररुपी मृत्यू
आला जबडा वासून
सापडले जे जे पुढे
सारे घेतले गिळून ।।६।।