|| वर्षाराणी |।
|| वर्षाराणी |।
येईल आता वर्षाराणी अंबरातुनी खाली रे|
घाम गाळुनी पिकव माणसा, माणिक मोती रानी रे||
आकाशामध्ये करतील दाटी, काळे पिवळे ढग सारे|
भानू झाकेल त्या पलीकडे, अधारेल हे जग सारे||
सप्तरंगाची उधळण करतील, इंद्रधनूची कमान रे|
नाच नाचुनी बिजली गगनी, तेज पसरेल भुई सारे||
वादळवारा येईल येथे, मेघ गर्जना करतील रे|
कोसळतील मग सरीवर श्री, मेघ बरसता पाणी रे||
थुई थुई नाचे मोर मानसी, मनी फुलोरा भरतील रे|
फुलव मळ्याला शेतकऱ्या तू, हर्षित होईल काय रे||
येईल आता वर्षाराणी अंबरातुनी खाली रे|
घाम गाळुनी पिकव माणसा, माणिक मोती राणी रे||