नाते संबध
नाते संबध
हळूवार जपते मी जन्मभराचे बंधन
सौम्य प्रकाशाने हे तिमीर उधळत
मी पणाचं वस्र घालू नये कुणी
गुंफण ही नात्याची जपावी मनात.......
गैरसमजाच्या या फटकारात
कील्मिषाने जिव्हाळा संपवी
अनादारातून दुंभगलेली मने
जाळ्यातून ओढून आणावी........
स्वार्थाच्या अंधत्वाने कलहात
नाते संबंध दुभंगुन श्वास कोंडतों
मनशांतीस सुरुंग लागतो तेंव्हा
संस्कार दाखवून वादळ क्षमवितों........
नाकर्तेपणाच्या या जीवाला
खटपटी करारात वेदना मिळते
कृतिशिलतेच्या प्रयत्न प्रेरणेला
पारितोषिकाचे आंदण मिळते.........