बघ जरा स्वतःकडे !
बघ जरा स्वतःकडे !
1 min
1.3K
होय! तूच,
बघ जरा स्वतःकडे,
आयुष्य खेळतय
तुझ्या जगण्या पलीकडे,
संकटात पण
जग जगतय अलीकडे!
बघ जरा, शेतकऱ्यांकडे
संकटात असून
दुष्काळात राहून
जगलेले ते खरे
स्वतःशी हरलेल्यानो
तुम्ही मेलेलेच बरे!
बघ जरा,अपंगांकडे
सगळं गमावून
अंधारात राहून
धैर्य त्यांचे डोळ्यापुढे
जगतात ते पाहून
तुमच्याकडे!
बघ जरा,जवानांकडे
हिंमत त्यांची देशापुढे
लढता लढता मरण यावे
हेची स्वप्न त्यांचे
स्वतःपुढे!
थांब जरा स्वतःपुढे
कोणासाठी कोण नव्हे
विश्वास ठेवून
निश्वास होऊन
आयुष्य हे तुझे खरंच
संगळ्यापेक्षा बरे!