कल्पतरू
कल्पतरू
1 min
334
आईच्या पदरात
सामावले विश्व सारे
लहानाचे मोठे होती
वात्सल्यात त्यारे
भूक लागता आठवे
आई सदाच लेकरा
स्वयंपाक घरात असे
घरातल्यांच्या चकरा
झाले भांडण कोणाशी
आई जवळ सदा घेतसे
पाठीवरून हात फिरवता
दुःख सारे दूर होतसे
आई असते कल्पतरू
लेकरासाठी सावली
जीवापाडचे नाते ते
असे तीच माऊली