जन्म मानवाचा
जन्म मानवाचा
कुठे आटला पाऊस
कुठे दाटला पाऊस
कुठे धो-धो कोसळला
कुठे पडेना पाऊस
कुठे पडल्या भिंती
जीव कवेत घेऊन
कुठे फुटले धरण
निष्पाप देह वाहुन
कुठे चोऱ्या माऱ्या
कुठे होतात खून
काय ठाऊक कसे
राहू सुरक्षित होऊन
रोज नवीन बातमी
आज हयातीत नाही
आपलंच माणुस कोणी
पडला तो मृत्यूमुखी
कधी कळणार माणसा
जगावं पूर्ण समाधानी
हा जन्म मानवाचा
पुन्हा पुन्हा नाही
बसली झळ जेव्हा
तेव्हाच का मानवा
किंमत लाख मोलाची
जाणली तू जीवांची