श्रमाचे महत्व
श्रमाचे महत्व
1 min
537
बैसूनिया खाली । वेळ वाया गेली ।
आणिक खुशाली । हरवली ॥ १॥
श्रमजीवी लोकं । असती जे जगी ।
किर्ती गाजे जगी । मात्र त्यांची ॥ २॥
करू नका कधी । श्रमाचा कंटाळा ।
हाचि ठोकताळा । ध्यानी धरा ॥३॥
होत नाही साध्य । श्रमाविना काही ।
नियम तू हा ही । ध्यानी धर ॥ ४॥
श्रमाची किमया । दिनेश सांगतो ।
तुम्हांला मागतो । वचन तों ॥ ५॥
राहू श्रममग्न । जीवनात सदा ।
आलस्याची बाधा । होऊ नये ॥ ६॥