Become a PUBLISHED AUTHOR at just 1999/- INR!! Limited Period Offer
Become a PUBLISHED AUTHOR at just 1999/- INR!! Limited Period Offer

Panditji Warade

Inspirational

3.3  

Panditji Warade

Inspirational

झाडे लावा

झाडे लावा

1 min
687


प्रॉम्प्ट-६ साठी

झाडे लावा

(अष्टाक्षरी)


ऊन पाऊस साहते

वारा वादळ झेलते

झाड मानवा करिता

थंडगार छाया देते।।१।।


झाड ढग अडविते

तेव्हा पाऊस पडतो

पशू पक्षी मानवाचा

जीव कसा सुखावतो।।२।।


हवेमध्ये वायू किती

नाही कुणाला गणती

हवा प्रदूषित होता

झाडे शुद्ध बनविती।।३।।


मार दगडाचा खाती

फळे गोड खाया देती

काळजात भरलेले

प्रेम मानवाच्या प्रति।।४।।


वृक्षतोड पाहुनिया

सूर्य देवही कोपला

अति क्रोधाने भास्कर

आग ओकाया लागला।।५।।


चहूकडे वृक्षतोड

राने बनली ओसाड 

शुद्ध हवा नसल्यास

बंद होई धडधड।।६।।


जागे होई रे माणसा

झाड लावा एक तरी

पाणी घालून प्रेमाने

जीव लावा बाळा परी।।७।।


पंडित वराडे, औरंगाबाद

०७.०५.२०१९


Rate this content
Log in